पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान ओमायक्रॉनचे (Omycron variant) चार रुग्ण बरे झाले असतानाच नव्या 4 रुग्णांचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 4513 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 27 लाख 07 हजार 937 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 77 हजार 937 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 66 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या शहरामध्ये 318 सक्रिय रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 191 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 127 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 4513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 58 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर
SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा
ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा