Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला, ”त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटते, एखाद्याची एवढी वाईट अवस्था होऊ नये”
पिंपरी : Jayant Patil On Ajit Pawar | शिरूर लोकसभा मतदार संघातील (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ भोसरीत (Bhosari Melava) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या ३५ जागा निवडून येथील, असा विश्वास व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी म्हटले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले, मागीलवेळी पाडले, त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्याच प्रचार करण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे. त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटते. एखाद्याची एवढी वाईट अवस्था होऊ नये.
जयंत पाटील म्हणाले, लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशावर २१० लाख कोटींचे कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या अवजारांवर, अन्नधान्यांवर जीएसटी लावला आहे. जनतेकडून पैसे लुटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.
महागाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले, पेटड्ढोल, डिझेल, गॅस महाग झाला. काँग्रेसच्या सत्ता काळात गॅसची किंमत चारशे रूपये होती. आता तोच गॅस एक हजारांच्या पुढे गेला आहे. देशाचे वातावरण बदलले आहे. संपूर्ण देश भाजपच्या विरोधात आहे. दहा वर्षात काय केले, याचा जाब देशातील जनता भाजपच्या (BJP) उमेदवारांना विचारत आहे. मात्र, त्याचे उत्तर उमेदवारांना देता येत नाही.
महायुतीचे उमेदवारी आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, काही लोक सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. मात्र, त्यांची संधी मागच्यावेळीच गेली आहे. आता नवीन चेहरा आहे. परिस्थिती वेगळी आहे. आढळराव-पाटील हे भाजपाच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जावून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करण्याची मानसिकता जनतेमध्ये आहे.
कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आवाहन करताना जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण चांगले आहे, मतदारांच्या घरापर्यंत पोहचा, त्यांना मतदानासाठी बुथपर्यंत आणा, चिन्हाबाबत गैरसमज पसरविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे घराघरापर्यंत तुतारी चिन्ह पोहचविले पाहिजे.
भाजपावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, मराठी माणसाने स्थापन केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. मतदानातून ही भावना व्यक्त करण्यासाठी जनता सज्ज असल्याचे राज्यभरात दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येथील. राष्ट्रवादी पवार पक्षाचे ८ खासदार निवडून येतील.
जयंत पाटील म्हणाले, संसदरत्न पुरस्काराविषयी काही लोकांना कावीळ झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना दहा वेळा तर अमोल कोल्हे यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. सभागृहात ज्यांनी कधी तोंडच उघडले नाही, त्यांना पुरस्कार मिळण्याचा प्रश्नच येत नाही.
भोसरीतील या मेळाव्याला उमेदवार डॉ. कोल्हे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे पुणे जिल्हासंपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका अनिता तुतारे, शिरूर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम उपस्थित होते.
Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
Comments are closed.