मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्यावर राज्य सरकार (Maharashtra Government) तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ (Salary increase) केली. परंतु विलिनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspend) करण्यात आले असून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठी घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारकडून कामावर परत येण्याबाबत आवाहन करण्यात आले. काही कार्मचारी कामावर परत आले परंतु काही कर्मचारी अद्याप आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरुच ठेवला आहे. यापार्श्वभूमीवर 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असे सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा (Mesma) न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, विलिनीकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या (High Court) समितीसमोर आहे.
त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होईल.
तोपर्यंत कामगारांनी (ST Workers Strike) कामावर परतावं, अशी भूमिका सरकारची आहे.
मात्र, कर्मचारी कामावर परतत नसल्यानं महामंडळनं निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.
आतापर्यंत राज्यभरात हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे आधीच तणावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
Web Title :- ST Workers Strike | anil parab appeal MSRTC workers to back on work ST Workers Strike.
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’