पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दारू पिण्यासाठी दारुच्या दुकानात गेले असताना दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
याप्रकरणी संतोष बाबासो चव्हाण (वय ४०, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निलेश घुले व त्याच्या दोन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा (Robbery Case) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. ते ८ डिसेबर रोजी रात्री १० वाजता कात्रज येथील जाधवनगरमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपी निलेश घुले याने संतोष याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले.
संतोष याने पैसे देण्यास नकार दिला असताना आरोपींनी त्याला लाथा बुक्यांनी मारहाण (Pune Crime) करुन त्याच्या खिशातील पाकीट व त्यातील ५०० रुपये व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangeeta Yadav) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | youth was beaten and robbed by his friends for not paying for alcohol; Incidents in Katraj area of Pune
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर
SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा
ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा