Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona |पुणे शहरातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या (Recover Patient) आणि बाधित रुग्णांची संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 77 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात आढळून आलेल्या ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झालेल्या रुग्णाने कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 500 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 41 हजार 236 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 07 हजार 493 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 97 हजार 596 रुग्ण बरे झाले आहेत. (Pune Corona).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या शहरामध्ये 790 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) असून यामध्ये 79 रुग्ण गंभीर आहेत. तर 50 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. शहरात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pune Corona | 77 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.
SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा
Comments are closed.