नवी दिल्ली :वृत्तसंस्था – SBI Customers Alert | देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे. बँकने ट्विट करत आपल्या ग्राहकांना अलर्ट (SBI Customers Alert) केले आहे, आणि त्यांना गरजेनुसार बँकिंगसंबंधी कामे उरकून घेण्याचे आवाहन केले आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्वाची सूचना करत म्हटले आहे की, बँकेच्या काही महत्वाच्या सेवा उद्या बंद (SBI Services) राहतील.
एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवा ग्राहकांसाठी शनिवार-रविवारच्या रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 4.30 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही. यासाठी तुम्ही 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी आपली ऑनलाईन बँकिंगची कामे उरकून घ्यावी. (SBI Customers Alert)
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/LZsuqO2B0D
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 10, 2021
बँकेने ट्विट करून दिली माहिती
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, टेक्नोलॉजी अपग्रेडेशनचे काम वरील कालावधीत केले जाईल. एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस, ज्यामध्ये INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI चा समावेश आहे. या असुविधेसाठी दिलगीर आहोत. (SBI Customers Alert).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगच्या सेवेचा वापर आठ कोटीपेक्षा जास्त आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे दोन कोटी लोक करतात. तर Yono वर रजिस्टर्ड ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर रोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात. एसबीआय देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आणि 57,889 पेक्षा जास्त एटीएमसह सर्वात मोठे नेटवर्क आहे.
Web Title :- SBI Customers Alert | sbi internet banking yono yono lite upi like facilities will remain closed on tomorrow.