Sanjay Raut | 50 रेडे गुवाहाटीला चालले म्हणणार्‍या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) चिमटा काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह पुन्हा एकदा 50 आमदार (शिवसेना – 40, अपक्ष – 10) गुवाहाटीला जाणार आहेत. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले, 50 रेडे परत गुवाहाटीला चालले आहेत. त्यावर शिंदे गटाने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जून महिन्यात शिवसेनेत बंड झाले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी गुवाहाटीला तळ ठोकला होता. आणि त्यानंतर त्यांनी गोवा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत सरकार स्थापन केले होते. त्यांनी त्यावेळी गुवाहाटीच्या कामाक्षी देवीला आमचे सरकार येण्याचा नवस देखील केला होता. तो फेडण्यासाठी सर्व पन्नास आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाच्या एका आमदाराने दिली होती. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 50 रेडे पुन्हा गुवाहाटीला जात आहेत. जाऊन दर्शन घेऊन या. पण, सुदर्शनचक्र आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातात सुदर्शनचक्र आहे. त्याने ह्या पन्नास रेड्यांचा राजकीय दृष्ट्या नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske)
यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आवाज न फुटणाऱ्या बावळट पेंग्विन पेक्षा रेडे परवडले.
रेड्यांनी शिंगे उगारल्यावर बिळात जाऊन लपू नका. लहान मुले खेळण्यातील सुदर्शन चक्र फिरवतात.
तसेच उद्धव ठाकरेंच्या हातात ते आहे. एक फुंकर मारली की ते तुटून जाईल, असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | cm eknath shinde group naresh maske reply sanjay raut and aaditya thackeray say penguin

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेचा गळ्यावर वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून, चाकण परिसरातील घटना

Tushar Gandhi | ‘महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती’ – तुषार गांधी

Areez Khambatta Passes Away | संपूर्ण भारताला ‘रसना’ची सवय लावणारे अरीज खंबाटा काळाच्या पडद्या आड

Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये विचित्र घटना, स्वतःला पेटवून घेऊन प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी