Tushar Gandhi | ‘महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती’ – तुषार गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) एका ठिकाणी त्यांनी सावरकरांवर भाष्य केले होते. त्यावरुन राज्यात गांधीविरोधी वातावरण भाजप (BJP) आणि शिंदे गटाने (Shinde Group) तयार केले. त्यात मनसे (MNS) देखील होती. आता त्याच मुद्यावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी आणखी एक भाष्य करून मोठा वाद निर्माण केला आहे. नथुराम गोडसेला महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) खून करण्यासाठी सावरकरांनी बंदूक पुरवली होती, असे तुषार गांधी (Tushar Gandhi) म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी यासंबंधी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘सावरकरांनी फक्त ब्रिटीशांना मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी त्यांनी नथुराम गोडसेला देखील मदत केली होती. वि. दा. सावरकर यांनी गोडसेला बंदूक पुरवली होती. महात्मा गांधींच्या हत्येच्या दोन दिवस अगोदर गोडसेकडे बापूंची हत्या करण्यासाठी कोणतेही शस्त्र नव्हते. ते त्याला सावरकरांनी पुरवले’, असे ट्वीट तुषार गांधी यांनी केले आहे.
Savarkar not only helped the British, he also helped Nathuram Godse find an efficient gun to murder Bapu. Till two days before Bapu’s Murder, Godse did not have a reliable weapon to carry out the murder of M. K. Gandhi.
— Tushar GANDHI Manavta Meri Jaat. (@TusharG) November 19, 2022
तसेच हे माझे मत नसून गांधी हत्येत सावरकरांचा हात आहे, की नाही, यासाठी भारत सरकारने कपूर आयोग
(Kapur Commission) नेमला होता, त्यांचे हे मत आहे.
26 – 27 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे (Nathuram Godse आणि नारायण आपटे
(Narayan Apte) सावरकरांना भेटायला दादरला त्यांच्या घरी गेले होते, अशी बातमी पोलिसांकडे होती.
तोपर्यंत बंदूक मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले होते. त्यानंतर ते दिल्लीतून ग्वालियर गेले.
ग्वालियरला परचुरे नावाचे गृहस्थ सावरकरांचे अनुयायी होते. त्यांच्याकडून त्यांनी बंदूक मिळवली.
त्यामुळे हा घटनाक्रम त्यांना बंदूक कुठून मिळाली, हे दाखवितो, असे देखील तुषार गांधी म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुषार गांधी यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे पुन्हा एकदा सावरकर आणि गांधी वाद पेटणार असल्याची
शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात देशात पुन्हा एकदा ‘गांधी हत्या आणि सावरकरांची त्यातील भूमिका’ हा
प्रश्न उभा राहणार आहे.
Web Title :- Tushar Gandhi | vd savarkar helped nathuram godse to find efficient gun to kill mahatma gandhi alleges tushar gandhi
हे देखील वाचा :
Areez Khambatta Passes Away | संपूर्ण भारताला ‘रसना’ची सवय लावणारे अरीज खंबाटा काळाच्या पडद्या आड
Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये विचित्र घटना, स्वतःला पेटवून घेऊन प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
Comments are closed.