औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – एका भांडणानंतर एका प्रियकराने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर प्रेयसीला मिठी मारल्याचा एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) घडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr Babasaheb Ambedkar University) परिसरात ही घटना घडली. या घटनेत (Aurangabad crime) दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे दोघेही विद्यापीठात झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. गजानन मुंडे (Gajanan Munde) असे युवकाचे नाव आहे.. आज दोघे हे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या महाविद्यालयात आले होते, त्यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले आणि प्रेयसीला मिठी मारली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमध्ये (Aurangabad Crime) दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांवर घाटी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन मुंडेने असे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Web Title :- Aurangabad Crime | boyfriend sets himself on fire and hugs girlfriend incident in aurangabad
हे देखील वाचा :
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक
Eknath Khadse | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात ‘तू तू मै मै’