Girish Mahajan | ‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून?’ तपासण्याची गरज, गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान
जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी (NCP Leader Eknath Khadse) जळगाव जिल्हा दूधसंघ (Jalgaon Jilha Dudh Sangh) ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र याला वेगळं वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुलगा नसल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आता, महाजनांनी त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘मला मुलगा नसला तरी दोन मुली आहेत याचा मला आनंद आहे, मात्र खडसेंना मुलगा होता त्याचं काय झालं? खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज आहे,’ असे धक्कादायक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, ‘खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी आहेत, चौकशीमध्ये सबळ पुरावे मिळत असल्याने खडसे अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते आजकाल काय बोलतात याच त्यांना भान राहत नाही. कधी ते मला चावट म्हणतात, कधी माझी बदनामी करा म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत.’
‘तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या मागे ईडी लागली. भोसरीमध्ये तुम्ही काय काय केलं हे समोर येतंय, बाकीच पण लवकरच समोर येईल. तुमचा जावई 17 महिने झाले भोसरी (Bhosari Corruption Case) प्रकरणात जेलमध्ये आहे, त्याचा जामीन तुम्ही का करत नाही? माझ्यावर खडसेंनी मोक्का लावला हे सांगायची गरज नाही.
खडसे, वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan), पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेलं षडयंत्र पेन ड्राईव्हने समोर आलं आहे.
आता ज्याने मला मला मोक्का लावला त्याची आणि खडसेंची ईडी चौकशी होत आहे.
आता दूध का दूध पाणी का पाणी होईल,’ असा इशारा गिरीश महाजनांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘एक बोट दुसऱ्याकडे केलं असताना चार बोटे आपल्याकडे असतात.
साधना महाजन या तुमच्याच कुटुंबातील आहे हे तुम्ही विसरला का? त्यांना 25 वर्षे पदे कशी मिळाली.
संधी दुसऱ्यांना देता अली असती. गिरीश महाजनांना मुलगा नाही.
नाहीतर मुलगा आणि सून दोघांना पदे मिळाली असती आणि कदाचित तेही राजकारणात आले असते’
असे खडसे म्हणाले होते. महाजन त्यांना प्रत्युत्तर देत होते.
Web Title :- Girish Mahajan | need to investigate eknath khadse son death whether it was murder or suicide says girish mahajan
हे देखील वाचा :
Sanjay Raut | 50 रेडे गुवाहाटीला चालले म्हणणार्या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले…
Pune Crime | महिलेचा गळ्यावर वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून, चाकण परिसरातील घटना
Comments are closed.