Pune Crime | महिलेचा गळ्यावर वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून, चाकण परिसरातील घटना

Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

चाकण : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | पुण्यातील मोठी औद्योगिक वसाहत (Chakan Industrial Estate) असलेल्या चाकण (म्हाळुंगे) परिसरामध्ये एका महिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) या महिलेचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना (Pune Crime) खराबवाडी गावच्या हद्दीमध्ये रविवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

 

याबाबत पोलीस कर्मचारी हनुमंत वसंत बांगर Hanumant Vasant Bangar (वय-36) यांनी महाळुंगे पोलीस चौकीत (Mahalunge Police Chowki) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी 302 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या (महाळुंगे) खराबवाडी येथील वाण्याचा मळा या ठिकाणी झुडपात 25 ते 27 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला.
महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून दगडाने ठेचण्यात आला आहे.
अद्याप या महिलेची ओळख पटली नाही. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे (Senior Police Inspector Sable) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

 

हे देखील वाचा :

Tushar Gandhi | ‘महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती’ – तुषार गांधी

Areez Khambatta Passes Away | संपूर्ण भारताला ‘रसना’ची सवय लावणारे अरीज खंबाटा काळाच्या पडद्या आड

Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये विचित्र घटना, स्वतःला पेटवून घेऊन प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार