बहुजननामा ऑनलाईन टीम – हिंदी पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला महालक्ष्मी व्रत केले जाते. यावर्षी महालक्ष्मीचे व्रत 25 ऑगस्ट रोजी मंगळवार पासून सुरू होणार आहे. संपत्ती व समृध्दीची देवी महालक्ष्मीची पूजा भाद्रपद शुक्ल अष्टमीपासून सुरु होऊन 16 दिवसांपर्यंत अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीपर्यंत असते. गणेश चतुर्थीनंतर चार दिवसांनी महालक्ष्मी व्रत सुरू होते. जे लोक 16 दिवस महालक्ष्मीचे व्रत करू शकत नाहीत, ते पहिल्या आणि शेवटच्या दिवशी महालक्ष्मीचा उपवास करतात. महालक्ष्मी व्रत, पूजा, मुहूर्त आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.
महालक्ष्मीच्या व्रताची सुरुवात: 25 ऑगस्ट 2020 रोजी मंगळवारपासून सुरुवात होईल.
महालक्ष्मीच्या व्रताचा शेवट: 10 सप्टेंबर 2020, गुरुवार पर्यंत.
महालक्ष्मीच्या व्रताचे मुहूर्त: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीची सुरुवात 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 21 मिनिटांपासून होत आहे, जे 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे.
महालक्ष्मी व्रताचे महत्त्व
भाद्रपद शुक्ल अष्टमीला महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते, याच दिवशी राधा अष्टमी म्हणजेच राधा जयंती देखील साजरा केली जाते. अष्टमीला प्रारंभ होणारे महालक्ष्मी व्रत खूप महत्वाचे असते कारण या दिवशी दुर्वा अष्टमी व्रत देखील पाळले जाते. दुर्वा अष्टमीला दुर्वा गवताची पूजा केली जाते. महालक्ष्मी व्रत धन, ऐश्वर्य, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते. या दिवशी लोक धनाची माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
महालक्ष्मी पूजा
जे लोक माता महालक्ष्मीचे व्रत करतात, ते पहिल्या दिवशी पूजेच्या वेळी हळदीने रंगविलेले 16 गाठ असणारे रक्षासूत्र आपल्या हातात बांधतात. 16 व्या दिवशी व्रताचे विधिपूर्वक उद्यापन केले जाते आणि ते रक्षासूत्र नदी किंवा तलावामध्ये विसर्जित केले जाते. महालक्ष्मीच्या उपासनेत दररोज देवी लक्ष्मीच्या ऊं आद्यलक्ष्म्यै नम:, ऊं विद्यालक्ष्म्यै नम:, ऊं सौभाग्यलक्ष्म्यै नम:, ऊं अमृतलक्ष्म्यै नम:, ऊं कामलक्ष्म्यै नम:, ऊं सत्यलक्ष्म्यै नम:, ऊं भोगलक्ष्म्यै नम: आणि ऊं योगलक्ष्म्यै नम: या आठ नावांचा पाठ केला जातो.