MahaShivratri 2021 : जाणून घ्या भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्त्व ! ‘ही’ पूजेची योग्य वेळ
बहुजननामा ऑनलाइन – माघ कृष्ण चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री (MahaShivratri 2021) आहे. विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण करण्याकरता महाशिवरात्रीला शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ॐ नम: शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा.
पूजेचा विधी आणि योग्य वेळ –
यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी पूजेची सर्वांत शुभ वेळ रात्री 12.06 ते दुसऱ्या दिवशी 12 मार्च रोजी रात्री 12.55 पर्यंत आहे. महाशिवरात्री प्रथम प्रहर पूजा सायंकाळी 6.27 ते रात्री 9.29 वाजेपर्यंत, द्वितीय प्रहर पूजा रात्री 9.29 ते रात्री 12.31 वाजेपर्यंत (12 मार्च), तृतीय पूजा प्रहर 12 मार्च रोजी रात्री 12.31 ते पहाटे 3.32 वाजेपर्यंत, चुतर्थ प्रहर पूजा पहाटे 3.32 ते पहाटे 6.34 वाजेपर्यंत आहे. चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 11 मार्च रोजी दुपारी 2.39 वाजता पासून ते 12 मार्च दुपारी 3.02 वाजेपर्यंत असणार आहे. 12 मार्च रोजी शिवरात्री पारण वेळ 6.34 ते 3.02 पर्यंत असणार आहे.
व्रत पद्धत व विधी
महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा व जागरण ही तीन अंगे आहेत. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात अशी मान्यता आहे. त्यांना यमपूजा असं म्हणतात. प्रत्येक यमपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावं. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवशंकराला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत.
प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. ओम नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावं. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध आणि पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत. भस्म वापरतात. शिव पूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
Comments are closed.