बहुजननामा ऑनलाईन – होळी रंगांचा उत्सव आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. तर काही लोक होळीच्या दिवशी भांग सुद्धा पितात. भांग पिणे नुकसानकारक असते, परंतु तरीही लोक याचे सेवन करतात. भांगची नशा जास्त असते. होळीला चुकून भांगचे सेवन केले तर काही वस्तू सेवन करून तुम्ही हँगओव्हरपासून बचाव करू शकता.
1) मोहरीचे कोमट तेल –
मोहरीचे तेल हलके गरम करा. हे तेल प्रभावित व्यक्तीच्या कानाात एक ते दोन थेंब टाका. यामुळे व्यक्तीला शुद्ध येईल.
2) आले –
प्रभावित व्यक्तीला आल्याचा तुकडा चोखण्यासाठी द्या. हळुहळु नशा उतरेल.
3) आंबट वस्तू –
आंबट वस्तूत अँटीऑक्सीडेंट्स असल्याने शरीरातील नशेच्या केमिकलचा परिणाम नष्ट होतो. यासाठी लिंबू मीठ लावू चोखा.
4) नारळ पाणी –
नारळ पाण्यात अँटी ऑक्सीडेंट असल्याने नशेच्या केमिकलचा परिणाम दूर होतो.
5) पाणी –
भांगची नशा उतरण्यासाठी व्यक्तीला भरपूर पाणी पाजा. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. यामुळे नशा उतरते.