बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड ॲक्ट्रेस अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खट्टर यांचा आगामी सिनेमा खाली पीली ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आजच ईशान आणि अनन्या यांच्या खाली पीली या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये ईशानला डेढ शाना आणि अनन्या तिखी छुरी असल्याचं सांगितलं गेलं आहे. सिनेमात दोघांचं कॅरेक्टरही खूप इंटरेस्टींग आहे.
अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी देखील सिनेमाचा टीजर त्यांच्या इंस्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. टीजर शेअर करताना दोघांनीही आपापल्या रोल बद्दल सांगितलं आहे.
अनन्यानं लिहिलं की, खाली पीली, चले तो तिखी छुरी, फटे धमाका, बोले तो बवाल है ये लडकी. बचके रहना नहीं तो खाली पीली बवाल हो जाएगा. डायरेक्टेड बाय मक्बुल खान. कमिंग सून.”
ईशाननं लिहिलं की, शानो की बस्ती में आ रेला है एक डेढ शाना. चल अब बत्ती बुझा और देख खाली पीली का गरमा गरम टीजर.”
काय आहे टीजरमध्ये ?
टीजरमध्ये दिसत आहे की, ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या व्यतिरीक्त सिनेमात काळ्या पिवळ्या टॅक्सीचाही एक वेगळा रोल आहे. आता या तिघांचं हे इंटरेस्टींग कनेक्शन लोकांना किती आवडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.