पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा प्रयत्न फसला असून, एकाला पळून जाण्यात यश आलं आहे. आकाश पवार, गणेश उर्फ़ अजय कांबळे आणि काळेवाडीतील रहिवासी कृष्णा सोनवणे, असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहे.
पोलिसांनी या तिघांना गंभीर स्वरूपाची दुखापत करणे, कबुतरांची ढाबळ या गुन्ह्याखाली अटक केलेली. नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान आणले होते. त्यावेळी तीनही आरोपींची पोलिसांशी वाद घालत पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यातील कृष्ण सोनवणे हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून, बाकी दोघांना पोलिसांनी धरून ठेवले होते. दरम्यान, या तिघांविरुद्ध पोलिस कस्टडीमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश केंगार करत आहे.