Pune Crime | भारत – वेस्ट इंडिज टी-20 सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या 6 जणांना पुणे पोलिसांकडून अटक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime 6 arrested for betting on India-West Indies T20 match Pune police seize Rs 7 lakh

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime |भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यावर (T-20 Match) बेटिंग (Betting) घेणाऱ्या सहा जणांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) गुलटेकडीतील (Gultekdi) एका सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून केली. याठिकाणी बेटिंग घेणार्‍या 6 जणांना अटक (Arrest) करुन 7 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अंबादास चंद्रकांत तावस्कर (वय 23, रा. उस्मानाबाद), समीर यशवंत जाधव (वय 41, रा. सोमवार पेठ), धनंजय सूर्यकांत गायकवाड (वय 34, रा. मिलिंदनगर, घोरपडीगाव), अनिल रत्नाकर बलकवडे (वय ३६, रा. सदाशिव पेठ), दिनेशकुमार मांगीलाल प्रजापती पालेवाल (वय 25, रा. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज सोमेश्वर भोकरे (वय 30, रा. मोहमंदवाडी, हडपसर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या बुधवारी रात्री टी-20 सामना सुरु होता. गुलटेकडी परिसरातील कावाजी हौसिंग सोसायटीच्या (Kawaji Housing Society) कंपाऊंडलगत असलेल्या रुममध्ये या सामन्यांवर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री पावणे नऊ वाजता पोलिसांनी छापा घातला. तेव्हा तेथे टीव्हीवर सामना पाहून ऑनलाइन मोबाईल व लॅपटॉपद्वारे बेटिंग घेतले जात असल्याचे आढळून आले. तेथे बेटिंग घेत असलेल्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 13 हजार 900 रुपये रोख व इतर साधने, मोबाईल असा 7 लाख 21 हजार 900 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

बेटिंग घेणार्‍यांकडील मोबाईलवर दुसर्‍याच्या नावाचे सीम कार्ड असून दुसर्‍याच्या नावावर सीम कार्ड
घेऊन त्याचा वापर बेकायदेशीर क्रिकेट बेटिंग घेण्यासाठी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रसाळ (API Rasal) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 6 arrested for betting on India-West Indies T20 match Pune police seize Rs 7 lakh

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

हे देखील वाचा