नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 28 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर संक्रमित लोकांची संख्या 32 लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा परिणाम जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. देशात कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्यांची संख्या 37776 झाली आहे. त्यापैकी 26535 अॅक्टीव्ह आहेत तर 10018 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्या मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 1223 लोगांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनामध्ये ‘म्यूटेशन’ झाले आहे ?
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) गेल्या दोन महिन्यांत देशात कोविड -19 च्या उद्रेकात कोरना विषाणूमध्ये उत्परिवर्तन (‘म्यूटेशन’) झाले आहे का याचा अभ्यास करण्याची योजना आखत आहे. ‘म्यूटेशन’ म्हणेजे कोणत्याही पेशीमध्ये अनुवंशिक बदल.
देशातील अव्वल आरोग्य संशोधन संस्थेच्या ज्येष्ठ शात्रज्ञांच्या म्हणण्यानुसर जर सार्स-कोवी 2 स्ट्रेन मध्ये बदल झाला आहे किंवा नाही याची माहिती मिळाल्यावर संभाव्य लसीची प्रभाविता सुनिश्चित करणे शक्य होईल. त्यांनी सांगितले की, अभ्यासातून हे संकेत मिळतात की हा विषाणू अधिक प्राणघातक झाला आहे की नाही आणि संक्रमण पसरवण्याची क्षमता वाढली आहे का हे दर्शवेल. कोविड -19 विषाणूमध्ये अनुवंशिक बदल झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी कोविड 19 रुग्णांकडून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला जाईल असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.
एनपी न्यूज 24 नेटवर्क