Punit Balan Group | पुनित बालन ग्रुप ईगल्सला वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

PBG Eagles-World Tennis League 2023

दुबई : Punit Balan Group | पुनित बालन ग्रुप ईगल्सने (PBG Eagles) वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे रविवारी रात्री रंगलेल्या अंतिम फेरीत त्यांनी टीम काइट्सचा 29-26 असा पराभव केला. अमेरिकन ओपन विजेता डॅनिल मेदवेदेव आणि 2023 ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळलेला आंद्रे रुब्लेव्ह आणि सोफिया केनिन त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (Punit Balan Group)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पुनित बालन ग्रुप ईगल्सने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना वर्ल्ड टेनिस लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र, त्यांना मिश्र दुहेरीची सुरुवातीची लढत गमवावी लागली होती. मेदवेदेव-मिरा अँड्रीवा जोडीला टायब्रेकरमध्ये पॉला बडोसा-स्टेफानोस त्सित्सिपास 6-7 (5-7) असे पराभूत केले. अपयशी सुरुवातीनंतर महिला आणि पुरुष दुहेरी तसेच पुरुष आणि महिला एकेरीत बाजी मारली. महिला दुहेरीत अँड्रिवा आणि सोफिया केनिन यांनी बॅडोसा आणि अरिना सबालेन्का यांनी जोडीला चुरशीच्या लढतीत 7-5 असे रोखले. (Punit Balan Group)

माझ्यासाठी ही पहिलीच वर्ल्ड टेनिस लीग होती. त्यात थेट विजयाने सुरुवात झाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्या वैयक्तिक कामगिरीसह सांघिक कामगिरीबद्दलही आनंदी आहे. पुरुष दुहेरीतील विजयाने खूश आहे. विशेषत: सोफियासोबत खेळलेल्या पहिल्या सामन्यात आम्ही हरलो होतो. सामन्यात पुनरागमन करण्यादृष्टीने आम्हाला विजय आवश्यक होता. त्यात कामगिरी उंचावण्यात यश आलो. आम्ही गमावलेली एकमेव दुहेरी मिश्र दुहेरी होती. पण ठीक आहे, टेनिसमध्ये असे होऊ शकते, असे जागतिक क्रमवारीत तिसर्‍या ष्थानी असलेल्या मेदवेदेव यांनी सांगितले.

पुरुष दुहेरीत मेदवेदेव आणि रुब्लेव्ह यांनी ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि लॉयड हॅरिसविरुद्ध 6-3 असा सहज विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला रुब्लेव्ह हा त्याच्या योगदानामुळे आनंदी होता. पोडियम फिनिशसाठी योगदान देता आल्याने तोही खूश आहे.

आजचे महान टेनिसपटू पीबीजी ईगल्सचा भाग असणे हा एक अप्रतिम अनुभव होता. त्यातच विजयासह अव्वल स्थान हीच आम्हा सर्वांची अपेक्षा होती. आमच्या संघाने ज्याप्रमाणे जिद्दीने खेळ केला. काही वेळा पिछाडीवरून पुनरागमन केले. तसेच क्लिनिकल फिनिश केली, हे सर्व आनंददायी आहे. चॅम्पियन म्हणून आम्ही 2023 वर्षाला निरोप दिला. त्यामुळे ईयर एंडिंगचा आनंद साजरा करण्याचे चांगले कारण मिळाले, अशी टिप्पणी पुनित बालनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन (Punit Balan) यांनी केली.

पीबीजी ईगल्सकडून महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या केनिनने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी साबालेन्का हिला पराभूत करून एका सर्वोत्तम विजयाची नोंद केली.

सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला पुरुष एकेरी लढतीत शानदार विजयाची आवश्यकता होती. त्यात ग्रिगोर दिमित्रोव्हने रुब्लेव्हवर 6-3 असा विजय मिळवला असला तरी 29-26 अशा फरकाने विजेतेपद मिळविण्यासाठी पीबीजी ईगल्सकडे पुरेसे गुण होते.