नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचा टीव्ही किंवा एसी लॉकडाऊनमध्ये खराब झाल्यास तुम्ही काय कराल ? ना कोणता इलेक्ट्रीशियन उपलब्ध आहे आणि ना बाजारपेठा खुल्या आहेत. पण काही कंपन्यांनी याचा तोडगा काढला आहे. उपकरणे दुरुस्त करण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत लॉकडाऊनने सर्व काही व्हर्चुअल केले आहे.
लॉकडाऊनमध्ये घरातील एखादी वस्तू खराब झाल्यास, एका फोनवर मदत उपलब्ध होईल. 247around एक राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन आणली आहे जिथे टेक्निशियन तुमची खराब झालेली उपकरणे कशी दुरुस्त करावी याबाबत फोनवर सांगतात. या टेक्निशियन्सच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा एसी किंवा वॉशिंग मशीन दुरुस्त करू शकता आणि हे सर्व पूर्णपणे विनामूल्य आहे.
सर्व गोष्टी ऑनलाइन
जर तुम्हाला फाइव्हस्टार हॉटेल डिनरची रेसिपी हवी असेल तरीही मदत तुमच्यासोबत आहे. सध्या बरेच मोठे शेफ व्हर्च्युअल आणि वैयक्तिक कुकिंग क्लासचे मार्गदर्शन करत आहेत. म्हणजे जेवण तुम्हीच बनवाल पण एक फाइव्हस्टार शेफ त्यात मदत करेल. वाहन खरेदी करणे देखील व्हर्चुअल झाले आहे. एमजी मोटर्ससह अनेक वाहन कंपन्या त्यासाठी तयारी करत आहेत. लॉकडाऊनमध्ये काम करण्याची पद्धत बदलत आहे आणि तंत्रज्ञानाद्वारे तुमची बहुतेक कामे व्हर्च्युअली पूर्ण होत आहेत.
एनपी न्यूज 24 नेटवर्क