Maval Lok Sabha Election 2024 | श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, भाजपा कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका, मावळमध्ये अडचणी वाढल्या
April 2, 2024
पिंपरी-चिंचवड : Maval Lok Sabha Election 2024 | महायुतीचे (Mahayuti) शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक सोपी असणार नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Vidhan Sabha) भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बारणे यांच्याकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे चिंचवडमधील मतदान हे मावळसाठी नेहमीच निर्णायक ठरले आहे. यामुळे श्रीरंग बारणे यांना भाजपा कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय असणार नाही.
चिंचवडमध्ये नुकतीच भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समस्त कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला. जिल्हाध्यक्षांच्या समोर बारणे यांनी आम्हाला भेटावे आणि आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात स्थानिक नेत्यांना सुनावले की, श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही. भाजपा कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे श्रीरंग बारणे यांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न श्रीरंग बारणे करत आहेत. श्रीरंग बारणे मावळमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, भाजपा कार्यकर्त्यांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीमुळे बारणे यांना मावळ लोकसभा सोपी जाणार नाही. बारणे यांनी अनेकांची मने दुखावली असल्याचीही चर्चा आहे.
Pune Marketyard Crime | पुणे : रमजान ईदच्या वर्गणीवरुन मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल; सराईत गुन्हेगारांना अटक
Comments are closed.