Pune Crime News | पुणे : कंपनी चालकाने केला कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत अपहार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कामगारांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधी (Provident Fund) कपात करण्यात आली होती. मात्र, कपात केलेली रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता कंपनी मालकाने स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील आरएनडी ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीत (RND Automation Pvt. Ltd.) मार्च 2019 ते जुलै 2022 या कालावधीत घडला आहे. कंपनी मालकाने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेमध्ये 6 लाख 25 हजारांचा अपहार केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रीमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक निखिल लॉरेन्स दुबॉईस Nikhil Lawrence Dubois (वय 40, रा. बधेनगर, सिल्वर हॉलच्या मागे, कोंढवा बुद्रुक) यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 सह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल दुबॉईस यांची येवलेवाडी रोडवर आरएनडी ऑटोमेशन प्रायव्हेट लि. कंपनी आहे.
या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या मासिक पगारातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आली.
मार्च 2019 ते जुलै 2022 या कालावधीत कामगारांच्या वेतनातून एकूण 18 लाख 01 हजार 528 रुपये कपात
करण्यात आले. त्यापैकी 11 लाख 75 हजार 812 एवढी रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा केली.
उर्वरीत 6 लाख 25 हजार 716 रुपयांचा अपहार केला. निखील दुबॉईस यांच्याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात फौजदारी
दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने दुबॉईस यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुदळे (API Kudale) करीत आहेत.
- Pune Minor Girl Rape Case | क्लासला जात असताना अल्पवयीन मुलीला फरपटत नेऊन बलात्कार, कोथरुड परिसरातील खळबळजनक घटना; 2 सख्ख्या भावांना अटक
- तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी, पुणे स्टेशन परिसरातील घटना
- पुण्यातील भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी, 85 तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला
- कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा
- ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.