Pune Minor Girl Rape Case | क्लासला जात असताना अल्पवयीन मुलीला फरपटत नेऊन बलात्कार, कोथरुड परिसरातील खळबळजनक घटना; 2 सख्ख्या भावांना अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | क्लासला जात असताना अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला फरपटत आडोशाला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Pune Crime News) केल्याची खळबळजनक घटना कोथरुड परिसरात घडली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत कोथरुड परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) मंगळवारी (दि.28) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन किशोर परमेश्वर केदार (वय-23) आणि नकुस परमेश्वर केदार (वय-21 दोघे रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांच्यावर आयपीसी 376,376/2/एन, 354ड सह पोक्सो कलम (POCSO Act) 4,6,12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी पिडित अल्पवयीन मुलगी कोथरुड परिसरातील एका क्लासला जात होती.
त्यावेळी नकुल केदार याने मुलीची वारंवार छेड काढली. याची तक्रार मुलीने नकुलचा मोठा भाऊ किशोर याच्याकडे केली.
याचा राग आल्याने नकुल याने पीडित मुलगी क्लासला जात असताना तिच्या क्लासच्या ठिकाणी असलेल्या एका
आडोशाला तिला फरफटत नेले. याठिकाणी तिच्या तोंडावर रुमाल दाबून जबरदस्तीने बलात्कार केला.
माझ्या भावाकडे तक्रार करते काय, तुला राहयचे नाही का अशी धमकी आरोपीने दिली.
तसेच मी ज्या वेळेस बोलवेल त्या वेळेस याचे, नाही आली तर तुझे काय करायचे ते बघतो.
असे म्हणत त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
- तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी, पुणे स्टेशन परिसरातील घटना
- Pune Crime News | पुण्यातील भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी, 85 तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला
- कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा
- ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.