Pune Crime News | तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, पुणे स्टेशन परिसरातील घटना

Threatening to Throw Acid

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | तरुणीचा पाठलाग करुन तिला मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी देऊन फोन करण्यास सांगितले. फोन केला नाही तर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी (Threatening to Throw Acid) दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुणे स्टेशन (Pune Railway Station) येथील पी.एम.पी.एम.एल बस स्टॉपवर 26 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 91X60XXXXX मोबाईल क्रमांक असलेल्या अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 354, 354ड, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित तरुणीचा दोन महिन्यांपासून पाठलाग करत आहे.
आरोपीने पीडित मुलीकडे तिचा मोबाईल नंबर मागितला. मात्र, तिने नंबर देण्यास नकार दिला.
रविवारी तरुणी तिच्या आईसोबत पुणे स्टेशन येथील बस स्टॉपवर वडगाव शेरीच्या बस चढत असताना आरोपीने तिचा
हात पकडून खचला. तसेच मला पुन्हा भेट असे म्हणून त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी तरुणीच्या पिशवीत टाकली.
मला फोन कर, जर फोन केला नाही तर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी आरोपीने दिली.
घाबरलेल्या तरुणीने मंगळवारी (दि.28) बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मधाले करीत आहेत.