ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – ACB Trap News | कृषी निविष्ठा दुकान सुरू करण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) कृषी अधिकाऱ्याला (Agriculture Officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुनील जगन्नाथ जाधव Sunil Jagannath Jadhav (वय 50, पद – सद्या रा. इंद्रजित कॉलनी,कोल्हापूर, मुळ रा.शाहूपुरी सातारा) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28) करण्यात आली. (ACB Trap News)
याबाबत 36 वर्षीय व्यक्तीने कोल्हापूर एसीबी (Kolhapur ACB) कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात. शेतकऱ्यांना लागणारे खत, बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदार यांना स्व:ताचे दुकान चालू करावयाचे होते. त्याकरीता आवश्यक असलेला परवाना (लायसन) मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी विभाग, कोल्हापूर कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. (ACB Trap News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी सुनील जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार
रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 9 हजार रुपयांची लाच मागणी केली. मागणी केलेली लाचेची 9 हजार रुपयांची
रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी
(Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला (PI Asma Mulla), श्रेणी पो.उप निरीक्षक संजीव बंबरगेकर पोलीस अंमलदार अजय चव्हाण,
विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.
- Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या 21 वर्षीय तरूणाचा खून
- Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
- Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…
Comments are closed.