Pune Crime News | पुण्यातील भोसले नगर परिसरात पुन्हा जबरी चोरी, 85 तोळे सोने, हिऱ्याचे दागिने चोरीला
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात घरफोडीच्या (Burglary) घटना सातत्याने घडत आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीतील भोसले नगर येथे दोन दिवसांपूर्वी जबरी चोरी झाली होती. चोरट्यांनी 32 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा याच भागातील एका बंद सदनिकेत चोरी करून 85 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली दागिने असा एकूण 17 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दोन दिवसात दुसरी जबरी चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत चैत्राली हर्षद भागवत (वय-32 रा. फाईव सेनसाई बिल्डिंग, अशोक नगर हौसिंग सोसायटी, भोसले नगर, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर रात्री सात ते 27 नोव्हेंबर सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी फाईव सेनसाई बिल्डिंगच्या पहल्या मजल्यावर राहतात. 25 नोव्हेंबर रोजी
त्या घऱाला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
फिर्यादी यांच्या खोलीमधील लॉकर फोडून चोरट्यांनी त्यामधील 17 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 85 तोळे
सोन्याचे दागिने, हिऱ्याचे व एम रॅली चे दागिने चोरून नेला. फिर्यादी 27 नोव्हेंबर रोजी घरी आल्या असता त्यांना घरात
चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील
(API Patil) करीत आहेत.
- Pune Crime News | कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचा अपहार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्यावर गुन्हा
- ACB Trap News | लाचेची रक्कम स्वीकारताना कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
- Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…
Comments are closed.