पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणार्या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रभात रोडवर (Prabhat Road) राहणार्या तिच्या पतीच्या २६ वर्षाच्या नातेवाईकावर विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती हे वेगवेगळे राहतात. फिर्यादी या पोटगी घेण्यासाठी प्रभात रोडवरील पतीच्या बंगल्यात २७ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता गेल्या होत्या. यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादी यांना मिठी मारली. ‘‘तू वेश्या है, अभी मै तुझे तेरी सही जगह दिखाता हु़ अभी तो ये ट्रेलर है, तू रुक मै तुझे अभी पुरी पिक्चर दिखाता हू, किसी दिन मे तेरा रेप करुंगा,’’ असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन (Pune Crime) केले. सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Indecent exposure to a woman who came for alimony; Shocking incident at Deccan Gymkhana.
Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु
Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित