पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सिंहगडरोड येथील धायरी (Pune News) येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना आज (गुरूवारी) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. वृषाली विश्वनाथ तांबे (Vrushali Vishwanath Tambe) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
याबाबत माहिती अशी, मृत वृषाली तांबे या धायरीतील रायकर मळा (raikar mala dhayari) इथं लक्ष्मीनारायण सोसायटीत वास्तव्यास आहेत. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वृषाली या मुक्ताई गार्डन परिसरातून दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Pune Crime).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, वृषाली तांबे या कर्वेनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर सिंहगड पोलिस (Sinhagad Police Station) घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Bad luck! Tanker-two-wheeler accident near Dhayari in Pune; Vrushali Vishwanath Tambe dies on the spot.
Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित