पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात (Pune district) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शहरात गेल्या 24 तासात 54 नवीन रुग्णांचे (new patient) निदान झाले आहे. तर 58 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
शहरामध्ये गेल्या 24 तासात 7 हजार 241 संशयित रुग्णांची तपासणी (Pimpri Corona) करण्यात आली. यामध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत शहरात 22 लाख 47 हजार 264 चाचण्यांपैकी 2 लाख 77 हजार 825 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 73 हजार 708 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या शहरात 335 अॅक्टिव्ह रुग्ण (active patient) आहेत यामध्ये 199 जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 136 जणांवर घरी उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 4 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 69 आणि 132 खासगी कोविड-19 लसीकरण (Vaccination) केंद्रावर 17 हजार 566 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत शहरात 27 लाख 25 हजार 081 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
Web Title : Pimpri Corona | 58 patients of ‘Corona’ discharged in Pimpri Chinchwad city in last 24 hours; Learn other statistics
Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Crime | व्हेलमाशाची एक कोटीची उलटी पाठवली कुरियरने, दोघांना अटक
Pune Crime | मनाविरूध्द पत्नी PhD करते म्हणून छळ, पतीविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा