पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. बुधवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 102 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 97 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे महानगर पालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 100 रुग्णांचे निदान (Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 348 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात सध्या 776 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या शहरामध्ये 84 रुग्ण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात शहराबाहेरील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. शहरात आजपर्यंत 9105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
web title : Pune corona 100 patients of corona in pune city in last 24 hours learn other statistics.