नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax Department | प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) गुजरातमधील स्टेनलेस स्टील व धातूच्या पाईपचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीवर धाड (IT Raid) टाकली. यामध्ये सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आणले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे २३ नोव्हेंबरला या समूहाच्या अहमदाबाद आणि मुंबई येथील तीन ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, धाडीमध्ये अनेक आक्षेपार्ह दस्तावेज आणि डिजिटल पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे ज्या बेहिशोबांच्या नोंदी समोर आल्या त्या व्यवहारांवर कोणताही कर भरला गेला नाही. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनिंदीत व्यवहार केले जात होते. कंपनीचा एक मुख्य व्यक्ती असून त्याच्या व्हाॅट्सअँप चॅट मधून हे व्यवहार उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.
कंपनीने करपात्र उत्पन्न कमी दाखविण्यासाठी अनेक व्यवहार दडवले,
तसेच बनावट व्यावसायिक नोंदी केल्या. प्राप्तिकर विभागास (Income Tax Department)
यासंबंधीचे पुरावे व्हाॅट्सअँप चॅट मधून मिळाले. दरम्यान या उद्योग समूहाचे १८ बँक लॉकर जप्त केले आहेत.
Web Title :- Income tax reveals transactions worth rs 500 crore raids gujarat industrial group.
7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ