लॉजचा मॅनेजर गवी रंगा कृष्णा गोवडा (वय-38 रा. किवळे, मूळ रा. भोईसर, मुंबई) आणि लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय-40 सध्या रा. कात्रज, मूळ रा. उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेट्टी हा आपल्या लॉजमध्ये काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Prostitution) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून मुंबई-बेंगळुरु महामार्गालगत (Mumbai-Bangalore Highway) असणाऱ्या किवळे येथील द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापेमारी केली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Pune Crime) केला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 10 तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये एका परदेशी तरुणीसह 6 परराज्यातील आणि 3 महाराष्ट्रातील तरुणींचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून 11 हजार 400 रुपयांची रोकड, 14 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि 300 रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | international prostitution racket exposed in dehu raod area of pune 10 woman released fir lodged on owner of lodge and manager
Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी