पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे (Rishikesh Vyavahare) व ऋषिकेश ताकवणे (Rishikesh Takawane) यांना माहिती मिळाली की, वाघोली (Wagholi) येथील एपिक सोसायटीमध्ये एका व्यक्तीने घरात घुसून एका महिलेवर चाकूने वार करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी चोरी करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून ठेवले होते. लोकांच्या ताब्यातून पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आईच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी सोसायटीमधील प्लॅटमध्ये पिण्यास पाणी मागण्याच्या बहाणा करुन महिलेवर चाकूने वार करुन दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikanda Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
–
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil),
पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे,
कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे,
सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | Citizens arrested a thief who stabbed a woman and robbed her pune police crime branch wagholi kesnand phata lonikand police station
Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले
Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण