बहुजननामा ऑनलाईन टीम – जर आपण कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर पीअर-टू-पीअर (पी २ पी) प्लॅटफॉर्म आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) देखरेखीखाली अनेक कंपन्या या व्यासपीठाशी संलग्न आहेत. त्यातीलच एक स्टार्टअप कंपनी म्हणजे ‘फिन्जी’ आहे. ज्याद्वारे आपण केवळ ४८ तासांच्या आत कर्ज घेऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता तुम्हाला सारखी बँकेत जाण्याची गरज नाही किंवा सीआयबीआयएलच्या कमी स्कोअरमुळे कर्ज नाकारले जाईल, अशी भीती पण नाही.
फिन्झीला केंद्रीय बँक आरबीआयने वर्ष २०१८ मध्ये परवाना दिला होता. दरम्यान, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://finzy.com/borrow या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे, कर्जाची रक्कम, कर्ज घेण्याचे कारण आणि कर्जाचा कालावधी याबद्दल माहिती द्यावी लागेल. यानंतर पॅन-मोबाइल व ईमेलची पडताळणी करावी लागेल. पुढील टप्प्यात, इतर काही माहिती विचारली जाईल. अॅड्रेस प्रूफसह इतर कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. याशिवाय बँकेचा तपशीलही द्यावा लागेल.
यानंतर कागदपत्रे आणि इतर गोष्टींच्या आढावाच्या आधारे कर्जाची रक्कम ४८ तासांच्या आत हस्तांतरित केली जाईल. याशिवाय अत्यंत मासिक ईएमआय सुविधेचा लाभ घेता येतो. त्याच वेळी, कोणताही दंड आणि गुप्त शुल्काशिवाय संपूर्ण किंवा काही प्रमाणात कर्जाची परतफेड करण्याचा एक पर्याय देखील आहे.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी हे दस्तऐवज आवश्यक आहे.
– पॅन कार्ड
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– मागील वर्षी आयटी रिटर्न / फॉर्म १६
– मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
– मागील ३ महिन्यांच्या पगाराची स्लिप
– ई-आधार किंवा चालू पत्त्याचा पुरावा
दरम्यान पीअर-टू-पीअर लँडर फिन्झी प्लॅटफॉर्मची सुरूवात अमित मोरे, अभिनंदन संगम, विश्वास दीक्षित आणि अपूर्व गावडे या ४ मित्रांनी केली होती. २०१८ मध्ये, फिन्जीला आरबीआयचा परवाना मिळाला.