बहुजननामा ऑनलाईन टीम – मध्यप्रदेशातील शिवपुरीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून दगडाने ठेचून पतीची हत्या केली. एवढेच नव्हे तर मृत पतीच्या प्रायव्हेट पार्टला देखील दुखापत केली आहे. मुकेश जाटव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, दरम्यान २४ तासांत पोलिसांनी या खून प्रकरणाचा खुलासा केला. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी एसपी राजेशसिंग चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मानस भवनमध्ये चेहरा छिन्नविछिन्न झालेला एक मृतदेह सापडला. त्यानंतर केलेल्या तपासात मृतांची ओळख पटल्यानंतर मुकेशच्या पत्नीने तिचा प्रियकर कल्लू पठाणसह मिळून त्याची हत्या केली. त्यात आणखी एका आरोपीचा समावेश आहे.
दरम्यान आपले कल्लू सोबत अनैतिक संबंध असल्याकारणाने हि हत्या केल्याची कबुली मुकेशच्या पत्नीने दिली आहे. या लोकांनी मुकेशला दारू पाजली आणि दगडाने ठेचून ठार मारले. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर देखील दुखापत केली. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली होती.