LIC Saral Pension Yojana | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 रुपये महीना, जाणून घ्या इतर जबरदस्त फायदे

LIC | lic notice for policy holders fake information with regard to penalty charges for kyc update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension Yojana | कोविड-19 महामारीच्या काळात आर्थिक स्थिरता आणि विम्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सुद्धा इन्श्युरन्स प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते. तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा प्लॅन (LIC Insurance Policy) घेण्याचा विचार करत असाल, तर एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

 

ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. हा प्लॅन जोडीदारासोबतही घेता येईल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेवूयात –

 

मागील वर्षी लाँच झाली पॉलिसी

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ने लोकांच्या आर्थिक गरजा (Financial Needs) लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली. या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही केवळ एकदाच प्रीमियम भरून ठराविक उत्पन्न (Fixed Income) मिळवू शकता.

या योजनेअंतर्गत, तुम्ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेऊ शकता. तुम्ही ही पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता. (LIC Saral Pension Yojana)

एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅन पॉलिसीधारकास 12,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. या योजनेअंतर्गत किमान वार्षिकी 12,000 रुपये प्रतिवर्ष आहे. किमान खरेदी मूल्य एन्यूटी मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून असेल. कमाल खरेदी किंमतीवर मर्यादा नाही. ही योजना 40 ते 80 वर्षे वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3000 गुंतवावे लागतील.

एलआयसीच्या या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून वार्षिकी निवडण्याचा पर्याय आहे.

दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
त्यांच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
लास्ट सर्व्हाइवरच्या मृत्यूनंतर, 100% विम्याची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल.

 

Web Title :- LIC Saral Pension Yojana | lic saral pension yojana get rs 12000 pension per month pay premium once check details

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा