मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. हॉटेलमध्ये वास्तव्याला असणार्या 30 डॉक्टर्सना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले सर्व डॉक्टर्स जेजे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करत होते. या सर्व डॉक्टरांना मरीन लाइन्स येथील धोबी तलाव परिसरातील फॉर्च्युन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सर्व डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना तत्काळ ट्रायडेंट हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
आग हॉटेलच्या चौथ्या मजल्यापर्यंत पसरल्याने हॉटेलमध्ये धावपळ सुरु झाली. धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडल होते. धुरामुळे लोकांना काहीच दिसत नव्हते. दरम्यान, हॉटेलमध्ये डॉक्टरांसोबतच काही क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या. या हॉटेलमध्ये जे.जे. हॉस्पिटलचे 28 ते 30 डॉक्टर राहत होते. सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून अग्निशमन दलाच्यावतीने कूलिंगचे काम सुरु आहे.