बहुजनामा ऑनलाईन टीम : विधानसभा निवडणुकीत महत्वाच्या असणाऱ्या कळवा – मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादीचे जिंतेन्द्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर शिवसेनेकडून अभिनेत्री दीपाली सय्यद मैदानात उतरल्या होत्या. तरी कळवा -मुंब्रा मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने कौल दिला असून आव्हाड यांनी बहुमताने विजयाची हॅटट्रिक केली आहे.
दरम्यान, दीपाली भोसले यांचा विवाह जहांगीर सय्यद यांच्याशी झाला. दिपालीने कळवा येथून दीपाली बनून तर मुंब्रा येथून सोफिया बनून प्रचार केला होता, परंतु दीपाली यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचा मतांसाठीचा हा डाव फेल गेला आहे. आणि या ठिकाणी दीपाली यांना पराभव स्वीकारावा लागला.
Visit : bahujannama.com