Maval Lok Sabha | महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’! मावळमध्ये सुद्धा शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वादावादी, तटकरेंना कडेलोटाचा इशारा

पुणे : Maval Lok Sabha | शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या नाकीनऊ आणले आहेत. तर तिकडे मावळ लोकसभा मतदारसंघात सुद्धा महायुतीमध्ये (Mahayuti) ऑल इज नॉट वेलचे संकेत मिळत आहेत. रायगड जिल्हा शिवसेना (Raigad Shivsena) कार्यकारिणीच्या बैठकीत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कडेलोटाची भाषा केली आहे. त्यामुळे मावळमध्ये सुद्धा महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले की, महायुतीच्या सूत्राचे खासदार सुनील तटकरे यांनीही पालन करायला हवे. राजकारणातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तटकरे यांनी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचाही कडेलोट करावा लागेल.
पेण येथे झालेल्या या जिल्हा कार्यकरिणी बैठकीत शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत आमदार थोरवे यांनी हे वक्तव्य केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीत महायुतीतील वाद स्पष्टपणे दिसून येत होता. शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीतील घटक पक्षांबाबत सामंजस्याची भूमिका घेतली जात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून तशी सामंजस्याची भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे युतीचा धर्म इतर पक्ष पाळत नसतील तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल, अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीबाबत आमदार थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने शिवसेना विरोधात कुरघोड्या करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शिवसेनेचे पदाधिकारी फोडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले जात आहे, असे थोरवे यांनी नमूद केले.
Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती
Comments are closed.