Kondhwa Pune Crime News | पुणे : धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : – Kondhwa Pune Crime News | धारदार हत्याराने तोंडावर व डोक्यावर वार करुन एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे (Murder In Kondhwa). ही घटना शनिवारी (दि.18) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) एका व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुलाब शेख (वय ४४, रा. कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबात पोलीस हवालदार रणजीत रंगनाथ शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी यश शाम अस्वारे (वय २० रा. कोंढवा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगे महाराज शाळे समोरील मोकळ्या जागेत असलेल्या खोल्यापैकी एका खोलीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका 40 ते 45 वर्षाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे दिसून आले. पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त R. राजा (R Raja IPS), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (Amol Zende DCP), सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे (Ganesh Ingle) , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Mansingh Patil), सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात (API Sachin Thorat), सुकेशीनी जाधव (API
Sukeshini Jadhav), लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde), पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.
Comments are closed.