Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 13 वर्षाच्या मुलावर चाकूने वार, एकाला अटक

May 18, 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर चाकूने वार (Stabbing Case) करुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास ओटास्किम निगडी (Nigdi Ota Scheme) येथे घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका 29 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत नारायण बळीराम लोखंडे (वय-40 रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी विजयानंद आत्माराम भागवत (वय-29 रा. सम्राट अशोक हौ. सोसायटी, निगडी) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 15 वर्षाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. त्यावेळी फिर्यादी यांच्या बिल्डींगच्या शेजारील बिल्डींग मध्ये राहणारा आरोपी भागवत याचे फिर्यादी यांच्या मुलासोबत भांडण सुरु होते.

फिर्य़ादी व त्यांचा 13 वर्षाचा पुतण्या भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्य़ादी यांच्या पुतण्याच्या गळ्यावर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

Rashmika Mandana-Atal Setu Bridge | अभिनेत्री रश्मिका मंधानाने केलं अटल सेतूचं कौतुक, काँग्रेसने दिली खोचक प्रतिक्रिया, आकडेवारीसह खोटा ठरवला दावा (Videos)