नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली असून सोन्यामध्ये शुक्रवारी १,३९५ रिपाई प्रति १० ग्रामची वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ झाल्यामुळे सोन्याचा भाव राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये ४१, ७०५ रु. प्रति १० ग्रामवर आला आहे. जागतिक किंमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे. महत्वाचे हे कि ४०,३१० रु. प्रति १० ग्राम किंमतीवर बंद झाले होते.
चांदीच्या भावातही शुक्रवारी जबरदस्त वाढ झाली असून शुक्रवारी २,८८९ रु. प्रति किलोग्रॅमने वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ झाल्यामुळे चांदीचा भाव ३८,१०० रु. प्रति किलोग्रामवर बंद झाला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, दिल्लीत शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव १,३९५ रु.ने वाढ नोंदवली गेली आहे. त्यांनी सांगितले की, सोन्याच्या जागतिक किंमतीत होणारी तीव्र वाढ यामुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे.