नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असून सामान्य लोकं चिंतेत आहेत. यादरम्यान, त्यांच्यावर महागाईचाही भडीमार होत आहे. खरतर मागच्या आठवड्यात अनेक गरजू वस्तू महागल्या आहेत. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल…
कोरोना व्हायरसमुळे हवाई तिकिटे महाग झाली असून सरकारने पुढच्या काही दिवसांसाठी सगळ्या इंटरनॅशनल फ्लाइट्स रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर डोमेस्टिक फ्लाइट्सच्या भाड्यातही मोठी वाढ केली आहे.
पुढच्या तिमाहीत तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खाते, PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमी व्याज मिळू शकते. जर असे झाले तर या छोट्या बचत योजनांवर तुम्हाला पहिल्यापेक्षा कमी व्याज मिळेल. सर्वसाधारणपणे लोकं या योजनेत बचत आणि व्याज आकर्षण लक्षात घेत गुंतवणूक करण्यावर जोर देत आहे.
यादरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत अमूल दुधाच्या किंमतीतही बदल झाले आहेत. पहिले अमूलचे टोन्ड दूध ४४ रु. प्रति लिटरच्या भावाने मिळत होते, जे आता वाढून ४५ रु. प्रति लिटर झाले आहे. तथापि, दुधाच्या किंमतीबाबत अमूलकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
रेल्वेने निवडक प्रकरणांशिवाय भाड्यात मिळणारी सवलत हटवली असून रेल्वेचा हा निर्णय २० मार्चपासून होणाऱ्या बुकिंगवर लागू होणार आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत हटवली गेली आहे. पण रुग्ण, विद्यार्थी आणि दिव्यांगांना मिळणारी भाड्यातील सवलत कायम राहणार आहे.
येत्या दिवसात मोबाइल फोनही महागणार आहेत, कारण याला १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये शामिल केले गेले आहे. याअगोदर हे उत्पादन १२ टक्के स्लॅबमध्ये होते. हे नवे दर १ एप्रिल २०२० पासून लागू होतील.
तसेच येत्या दिवसात पेट्रोल आणि डिझेलही महाग होऊ शकते, कारण सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ३ रु.ची वाढ केली आहे. आता जागतिक कच्च्या तेलाची किंमत स्वस्त झाली असून पेट्रोल-डिझेलवर सर्वसामान्यांना आणखी सवलत मिळेल, असे वाटत होते.
रेल्वेने ६ डिव्हिजनच्या स्टेशनसाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयाने वाढवून ५० रु. केले आहेत, जेणेकरून गर्दी कमी होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार, मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर डिव्हिजनच्या स्टेशनवर आता १० ऐवजी ५० रुपयात प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे, जेणेकरून स्टेशनवर अनावश्यक गर्दी होणार नाही. हा नियम १६ मार्चपासून लागू झाला आहे.