‘कोरोना’मुळे नोकरी गेली तरी घाबरु नका ! मोदी सरकारच्या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला असून अनेकजणांवर नोकरी गमावण्याचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या महामारीचा परिणाम येणार्या काळात अधिक जाणवणार असून अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांमध्ये कपात करण्यास सुरूवात केली आहे. या संकटाच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात लोकांच्या नोकर्या जाण्याची भीती आहे. दरम्यान केंद्र सरकारची अशी एक योजना आहे, ज्यामुळे बरोजगार झाल्यास 24 महिन्यांसाठी तुम्हाला पगार मिळणार आहे.
मोदी सरकारच्या या योजनेचे नाव ’अटल बीमित व्यक्ती कल्याण’ योजना असे आहे. योजनेअंतर्गत तुम्हाला नोकरी गेल्यास सरकार तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे. ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहे. मागील 90 दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम बेरोजगार व्यक्तीला मिळेल. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील तेच व्यक्ती उचलू शकतात ज्यांना विमा मिळतो आहे आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ ज्यांनी नोकरी केली आहे. त्याशिवार डेटा बेसशी आधार आणि बँक डिटेल्स संलग्न असणे आवश्यक आहे. दरम्यान, चुकीच्या वर्तणुकीमुळे कंपनीतून काढून टाकले असल्यास त्या व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय फौजदारी खटला दाखल झाला असल्यास किंवा कर्मचार्याने स्वेच्छानिवृती घेतली असल्यास अशानाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
Comments are closed.