अहमदाबाद :वृत्तसंस्था –जगभरात कोरोनाचा हैदोस सुरु असून आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 75 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. मात्र गुजरातमधील बनासकांठा इथे 5 वर्षांपासून कोरोना ठळक अक्षरात झळकत असल्याचे दिसून आले आहे. बनासकांठा इथे एक हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव कोरोना ठेवण्यात आले आहे. राजस्थान बॉर्डरवर असलेल्या अमीरगढ इथे कोरोना नावाने असलेल्या या हॉटेलकडे आता पाहिले की लोकांना धक्का बसत आहे.
देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. मात्रा, अशाही परिस्थितीत कोरोना असे हॉटेलचे नाव असल्याने लोक हॉटेलसमोर थांबून सेल्फी काढत असल्याचे हॉटेलचे कुतुहल वाढत आहे. त्याठिकाणी सेल्फी काढणार्यांचे प्रमाण इतके आहे की, हे ठिकाण आता सेल्फी पाँइंट झाला आहे.
सिद्धपूरमध्ये राहणार्या बरकतभाई यांनी 2015 मध्ये हॉटेल सुरू केले होते. तेव्हा नाव काय ठेवायचे असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यावेळी उर्दू शब्द कोरोना आठवला. उर्दूत कोरोनाचा अर्थ स्टार गॅलेक्सी असा आहे. आता जेव्हापण लोक या हॉटेलसमोरून जातात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.