मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे बंद करण्यात आलेल्या आस्थापना हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः वाईन शॉपी उघडण्यासंदर्भात शासनाने नियम शिथिल केले आहेत. त्यापार्श्वभूमीवर दारु खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी इ-टोकन सुरु केले आहे. त्यामुळे वाईन शॉप मध्ये होणार्या गर्दी पासून सुटका होणार आहे. हा निर्णय तुर्तास पुण्यातपुरता झाला असून मुंबईसह राज्यातील विविध भागात निर्णय लागू करण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे अनेक ग्राहकांना मद्य खरेदी करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर सोशल डिसटन्स पाळून इ-टोकनच्या माध्यमातून दारुविकृी करण्याचे धोरण महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वीकारले आहे. संबंधित ग्राहकांनी संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे.
सुरुवातीला ग्राहकाने मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर जिल्हा व पिन कोड समाविष्ट करुन सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास नजीकच्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसणार आहे. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.