पुणे : Ravindra Dhangekar On Devendra Fadnavis | ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, अशा शब्दांत पुण्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे उमेदवार (Congress Candidate) रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. मात्र, धंगेकर यांनी फडणवीसांवर टीका करतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आपण पाहिलेत, पण कोरोना काळात केलेले श्रेय हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच द्यावे लागेल असे ते म्हणाले.
रवींद्र धंगेकर म्हणाले, पवार कुटुंब फुटू नये असे कार्यकत्र्यांना वाटत होते. पण दादाला कसे नेले हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपने (BJP) मित्रपक्ष शिवसेनेला त्रास दिला आता अजित पवारांना काय करतील सांगता येत नाही.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या ३ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. याबाबत धंगेकर म्हणाले, ही सभा देशाच्या मुद्यावर होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी येत आहेत. मोदींच्या सभेला उत्तर म्हणून ही सभा नाही, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
Loni Kalbhor Pune Crime | हॉटेल कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, लोणी काळभोरमधील घटना