Eknath Khadse | एकनाथ खडसेंची भाजपवर घणाघाती टीका; म्हणाले – ’40 वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच…’

जळगाव :बहुजननामा ऑनलाइन – Eknath Khadse |भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे मागील काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकतंच जळगावातील (Jalgaon) रावेर (Raver) येथे झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर नाव न घेता टीकास्त्र सोडले. 40 वर्ष जेव्हा मी तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. मग आता राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी (ED) का लावली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राष्ट्रवादीत गेल्यापासून आपल्या मागे ईडीची चौकशी लावली जात असून तारीख पे ताऱीखचा खेळ सुरु असल्याचं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं.
भाजपवर टीका करत खडसे म्हणाले की, सध्याचं राजकारण (Politics) तुम्ही पाहत आहात.
कोणाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जातात, हे स्पष्टपणे दिसतं.
आपण भाजप पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर परिश्रम घेतले तसेच कष्ट केलं.
मात्र, ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले, आता त्याचाच तुम्ही असा अपमान (Insult) केला, असे खडसे म्हणाले.
भाजपवर टीका करताना खडसे म्हणाले, तुम्ही जे करत आहात, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल, जनता तुम्हाला माफ करणार नाही.
जळगावातील रावेर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.
Web Title :- Eknath Khadse | NCP leader eknath khadse criticizes bjp over ed inquiry.
Comments are closed.