Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विळखा वाढला, गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल नव्या कोरोनाबाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 36 हजारांच्या पार गेली होती. तर आज हीच आकडेवारी थेट 40 हजारांच्या पार गेली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 40 हजार 925 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झालेली नाही.
राज्यात आज 14 हजार 256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 65 लाख 47 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.8 टक्के झाले आहे. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.07 टक्के झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1479481103895326720?s=20
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 01 लाख 46 हजार 329 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 68 लाख 34 हजार 222 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.74 टक्के आहे. सध्या 1 लाख 41 हजार 492 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 7 लाख 42 हजार 684 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona patient numbers rise in the state 40,925 new patients in last 24 hours find out other statistics
Rakesh Jhunjhunwala चा ‘हा’ स्टॉक पोहचला ऑल-टाइम हाय ! पुढे काय आहे शक्यता? जाणून घ्या
Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…
PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या
Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘ एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’
Comments are closed.