Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा

Five State Assembly Election-2022 | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand bjp congress pm security breach reactions

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Five State Assembly Election-2022 | मागील काही दिवसांपासून पाच राज्यातील निवडणुकांविषयी जोरदार चर्चा सुरू होत्या. पाचही राज्याच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून होते. मात्र आज (शनिवारी) निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाचही राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा (Five State Assembly Election-2022) जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Election Commissioner Sushil Chandra) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे आता गोवा (Goa), मणिपुर (Manipur), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मागील काही काळात कोरोनाचे संकट (Coronavirus) वाढल्याने निवडणुका लांबणीवर टाळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने 5 राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पाचही राज्यातील निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे निवडणुक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तरी या निवडणूका कोरोनाचे नियम पाळून पार पडल्या जाव्यात असं सांगण्यात आलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. रोड शो आणि बाईक शोवर देखील बंदी घालण्यात आले असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. (Five State Assembly Election-2022)

दरम्यान, 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राची संख्या 16 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. यंदा मतदान केंद्राची संख्या दोन लाख 15 हजार 368 आहे. ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है हवा की ओट की ख़िलाफ़ भी दिया जलता है,’ कोरोना महामारी से निकलेंगे हमे यकीन है! या शायरीच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वा आव्हांनाचा सामना करत निवडणुका घेतल्या जातील अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा –

उत्तर प्रदेश – 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी (7 टप्प्यात मतदान)

मणिपूर – 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होणार (2 टप्पा)

पंजाब, – 14 फेब्रुवारी

उत्तराखंड – 14 फेब्रुवारी

गोवा – 14 फेब्रुवारी

पाचही राज्याची मतमोजणी – 10 मार्च 2022

Web Title :- Five State Assembly Election-2022 | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand bjp congress pm security breach reactions

Pune Crime | धक्कादायक ! 10 वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या; पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक ! आरोग्य कर्मचारी ‘गोत्यात’; बारामती पोलिसांची कारवाई